Inspired by the pleasant cool mornings in National Park, Mumbai,
गुलाबी थंडीत हसली मुंबई
ओढून घेतेय मऊ दुलाई
तोंडातून वाफा पाण्यावर धुके
झाडांचे रंग फ़िके फ़िके
ऊन सूर्याचा पत्ता नाही
सकाळ जणू साखर झोपेत राही
काढ़ा स्वेटर मफलर शाल
आत्ता नाही तर कधी मिरवाल
घाम विसरून खुश होणार आम्ही
गुलाबी थंडी आमच्या मैत्रिणी
अशीच कधीतरी येत जा
मुंबईकरांना भेटत जा
No comments:
Post a Comment